मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकसभा मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील ५६ गावच्या यात्रा व १३ गावचे आठवडे बाजार पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली.
दि.१७ एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या दिवशी सातारा तालुक्यातील ११ गावच्या यात्रा व दोन गावचे आठवडे बाजार पुढे ढकलण्यात आले आहेत. जावली तालुक्यातील ३ गावच्या यात्रा, वाई तालुक्यातील ११ गावच्या यात्रा, खंडाळा तालुक्यातील ४ यात्रा व १ आठवडे बाजार, कराड तालुक्यातील ३ यात्रा व २ आठवडे बाजार, पाटण तालुक्यातील ३ आठवडे बाजार, कोरेगावमधील ११ यात्रा व १ बाजार, खटाव मधील ५ यात्रा व १ बाजार, माण तालुक्यातील २ यात्रा व २ बाजार आणि फलटण तालुक्यातील ६ यात्रा तसेच १ आठवडे बाजार पुढे ढकलण्यात आले आहेत.
साता-यातील ५६ यात्रा, १३ बाजार पुढे ढकलले
मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकसभा मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील ५६ गावच्या यात्रा व १३ गावचे आठवडे बाजार पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली.
First published on: 17-04-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 56 pilgrimage and 13 weekly market postpone for election in satara