सांगली : बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवत  ५७ लाख रूपयांचे कर्ज उचलून  बँक ऑफ इंडियाची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोकरूड (ता. शिराळा) पोलीस ठाण्यात  २६  जणाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा बँकेच्यावतीने दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत माहिती अशी, शिराळा, वाळवा व शाहूवाडी तालुक्यातील २६ जणांनी बँकेकडे गेल्या वर्षभरात सोने गहाण ठेवून कर्ज उचलले आहे. १ किलो ७३१ ग्रॅम वजनाचे दागिने गहाण ठेवून ५७ लाख  ६१  हजार  ४९८ रूपयांचे कर्ज २६  डिसेंबर  २०२२ते ४ डिसेंबर २०२३ या कालावधीत हे कर्ज घेण्यात आले. चौकशीमध्ये तारण ठेवण्यात आलेले दागिने नकली व बनावट सोन्याचे असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे बँकेची फसवणूक झाली असल्याची तक्रार बँक ऑफ इंडियाचे कोकरूड शाखाधिकारी योगेश देसाई यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली असून यावरून २६ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणार्‍यामध्ये ११ महिलांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 57 lakh fraud of the bank by pledging fake gold sangli amy