अलिबाग- रायगड लोकसभा मतदारसंघातील १३ उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा खर्च निरीक्षक धीरेंद्रमनी त्रिपाठी यांनी तिसरा व अंतिम आढावा घेतला. यात सुनील तटकरे यांनी प्रचारासाठी सर्वाधिक खर्च केल्याची दिसून आहे. त्याखालोखाल अनंत गीते आणि कुमूदीनी चव्हाण यांनी प्रचारासाठी खर्च केल्याचे समोर आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना मिश्किल टोला; म्हणाले, “अरे बापरे! साहेबांचं किती उदार अंतकरण”
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरील खर्चाचे नियंत्रण ठेवण्यासाठी उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाचा तीन टप्प्यात आढावा घेतला जातो. ज्यावर जिल्हा खर्च संनियंत्रण समिती देखरेख ठेवते. प्रचारावरील खर्च हा ९५ लाखांच्या आत असणे अभिप्रेत असते. निवडणूक यंत्रणाही उमेदवारांच्या प्रचारावरील दैनंदीन खर्चावर लक्ष ठेवून नोंदी ठेवते असते. उमेदवारांनी सादर केलेला खर्चाचा तपशील आणि शासनाने ठेवलेल्या निरीक्षकांनी ठेवलेल्या खर्चाचा तपशील पडताळून पाहीला जात असतो. उमेदवारांनी खर्च कमी दाखवला असल्यास शासकीय नोंदी नुसार वाढीव खर्च उमेदवारांच्या खर्चात जोडला जात असतो.
हेही वाचा >>> ‘शिंदे यांच्याकडील नगरविकास, रस्ते विकास खाती मी नाकारली’
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल दत्तात्रेय तटकरे यांनी ५६ लाख ८२ हजार ६२८ रुपये खर्च दाखवला होता. शासकीय नोंदवही नुसार तो ५८ लाख १७ हजार २६६ रुपये झाल्या असल्याचे दिसून आले. त्यामुळे शासकीय नोंदीनूसार तटकरे यांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली, शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार अनंत गीते २७ लाख ६२ हजार २४७ रुपये खर्च दाखवला होता. शासकीय नोंदी नुसार ३० लाख ६४ हजार ९३४ रुपये झाले असल्याचे दिसून आले. त्यामुळे शासकीय नोंदीनुसार खर्चास मंजूरी देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या कुमुदिनी रविंद्र चव्हाण ८ लाख ५५ हजार ६२५ रुपये, भारतीय जवान किसान पार्टीचे कर्नल प्रकाशराव चव्हाण ४६ हजार ३७९ रुपये, अजय उपाध्ये १ लाख ४९ हजार ९८०, अमित श्रीपाल कवाडे अपक्ष ३८ हजार ८८२ रुपये, अंजनी अश्विन केळकर अपक्ष ३५ हजार ७४५ रुपये, मंगेश पद्माकर कोळी अपक्ष ४१ हजार ६१ रुपये, पांडुरंग दामोदर चौले अपक्ष ३८ हजार ८६९ रुपये, नितीन जगन्नाथ मयेकर अपक्ष २५ हजार १५१ रुपये , श्रीनिवास सत्यनारायण मट्टपती अपक्ष ३८ हजार ७१४ रुपये, अनंत पद्मा गिते अपक्ष २५ हजार २०० रुपये , अनंत बाळोजी गिते अपक्ष २५ हजार ९५४ रुपये केले आहेत. त्यामुळे प्रचारावरील खर्चात सुनील तटकरे यांनी सर्वाधिक निधी खर्च केला असून, अनंत गिते यांनीही प्रचारावर मोठा निधी खर्च केला आहे.