महाराष्ट्रात ६ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १५९ वर गेली होती. मात्र आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील करोनाग्रसतांची संख्या १७७ झाली आहे. आज सकाळीच मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आता १५९ झाल्याचं राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलं होतं. मात्र आता ही संख्या १७७ वर जाऊन पोहचली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच घरातच थांबा, करोनाला रोखा असं आवाहनही करण्यात आलं आहे. तरीही महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

सांगलीतील इस्लामपूर भागात काल एकाच कुटुंबातील १२ जणांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. त्यामुळे इस्लामपूर येथील हा भाग बंद करण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत रुग्ण संख्या १४७ होती. मात्र आता ती वाढून १५९ वर पोहचली होती. जी आता १७७ झाली आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण?

अंदमान निकोबार-२
आंध्रप्रदेश-१४
बिहार-०९
चंदीगढ-७
छत्तीसगढ-६
दिल्ली-३८
गोवा-३
गुजरात-४४
हरयाणा-१९
हिमाचल प्रदेश-३
जम्मू-काश्मीर-१८
कर्नाटक-५५
केरळ-१६५
लडाख-१३
मध्यप्रदेश-३०
महाराष्ट्र-१७७
मणिपूर-१
मिझोराम-१
ओदिशा-३
पुद्दुचेरी-१
पंजाब-३८
राजस्थान-४६
तामिळनाडू-३२
तेलंगण-३८
उत्तराखंड-४
उत्तरप्रदेश-४४
पश्चिम बंगाल-१५

मुंबईत शुक्रवारपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या ८६ वर गेली होती. मात्र पाच नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या आता ९१ वर पोहचली आहे. दरम्यान मुंबईत शुक्रवारी ८५ वर्षीय डॉक्टरचा मृत्यू हिंदुजा रुग्णालयात झाला. या डॉक्टरांचा नातू काही दिवसांपूर्वी लंडनहून परतला होता. त्याला घरात अलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्याच्या संपर्कात आळ्याने या डॉक्टरांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दरम्यान या डॉक्टरांचा मुलगा हृदयरोग तज्त्र असून त्यांच्या सुनेलाही करोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. सैफी रुग्णालयाचे हे डॉक्टर होते. त्यामुळे सैफी रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागही बंद करण्यात आला आहे.

६० टक्के रुग्णांचा परदेश प्रवास इतिहास
मुंबई परिसरातील एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण हे परदेश प्रवास केलेले आहेत. तर अन्य रुग्णांमध्येही निकटवर्तीयांचा समावेश आहे, त्यामुळे मुंबईकरांनी घाबरू नये असे आवाहन पालिकेच्या उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.

Story img Loader