नगरःनगरहून आष्टीकडे जाणाऱ्या प्रवासी डेमू रेल्वेला आग लागून पाच डबे जळून भस्मसात झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणास दुखापतही झाली नाही. घटना आज, सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास नगर शहराजवळील शिराढोण ते वाळुंज फाटा या दरम्यान घडली. या रेल्वेत तुरळक ८ ते १० प्रवासी होते. प्रवाश्यांनी जीवाच्या भीतीने, वेग कमी झाल्यानंतर धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> मालगाडीवर केलेल्या दगडफेकीत चालक जखमी

बहुचर्चित व बहुप्रतिक्षित नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे, नगर ते आष्टी या रेल्वेरुळाचे काम पूर्ण होऊन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही रेल्वे सुरु करण्यात आली. सुरुवातीला सकाळी व संध्याकाळी अशा दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र प्रवाशांचा प्रतिसादच नसल्याने काही दिवसातच एक फेरी कमी करण्यात आली.

आज दुपारी नगरहून आष्टीकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या पहिल्याच डब्याला आग लागली व ती पसरत गेली. राष्ट्रीय महामार्गचे काम करणारे रस्त्यावरील मजूर व वाळुंज ग्रामस्थांच्या लक्षात आग लागल्याची बाब आली. त्यांनी आरडाओरडा करत माहिती दिली तसेच रेल्वे प्रशासन व नगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले. मनपा तसेच संरक्षण विभागाच्या सीक्यूएव्ही, व्हीआरडीई व नगर एमआयडीसीचे सहा बंब आग विझवण्यासाठी धावले. तोपर्यंत पाच डबे आगीच्या भक्षस्थानी पडले होते.

हेही वाचा >>> महिलांनी तोकडे कपडे घालणे अश्लीलता नाही, उच्च न्यायालय असे का म्हणाले?

सायंकाळी ४:१५ च्या सुमारास आग विझवण्यात अग्निशामन दलाच्या यंत्रणांना यश आले त्यानंतर रेल्वे च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उर्वरित डबे बाजूला काढले या घटनेत कोणासही दुखापत झालेली नाही मात्र आग कशामुळे लागली हे रेल्वे प्रशासनाने सायंकाळी उशिरापर्यंत स्पष्ट केले नव्हते. गार्डच्या बाजूची ब्रेक व्हॅन व त्याला लागून असलेले सहा डबे जळून खाक झाले. दौंड होऊन घटनास्थळी रेल्वे अपघात मदत विभागाची (एआरटी) यंत्रणा पाठवण्यात आली होती. रेल्वे इंजिनला लागूनच ऑईलची टाकी होती, या टाकीजवळ आग पोहोचण्यापूर्वीच ती वीजवण्यात आली. परिणामी टाकीचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.