कराड : कराडच्या मुजावर कॉलनीत आज बुधवारी (दि. २५) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. घरांची पडझड व भिंती कोसळताना, तीन-चार दुचाकी वाहनांचे नुकसानही झाले. तर, ७ जण जखमी झालेत. घरगुती गॅस सिलेंडरचा हा स्फोट असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु, घरगुती गॅसचा एवढा भीषण स्फोट होत नसल्याने लोकांमधून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शरीफ मुबारक मुल्ला (३६), सुलताना शरीफ मुल्ला (३२), जोया शरीफ मुल्ला (१०), राहत शरीफ मुल्ला (७), यांच्यासह अशोक दिनकर पवार (५४), सुनीता अशोक पवार (४५), दत्तात्रय बंडू खिलारे (८०) सर्व राहणार शांतिनगर, मुजावर कॉलनी, कराड अशी या स्फोटातील जखमींची नावे आहेत. जखमींना येथील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ॉ

हेही वाचा : यूपीएससी २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारखा…

भीषण स्फोटाच्या आवाजाने मुजावर कॉलनी हादरताना, लोकांची प्रचंड धावपळ उडाली. अनेक ठिकाणांहून लोकांनी घटनास्थळी एकच धाव घेतल्याने एकच गर्दी झाली होती. तर, पोलीसही तातडीने दाखल होत या स्फोटाची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनीही घटनास्थळी पाहणी करून, तपासकामी सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा : “मला एका गोष्टीची भीती वाटतेय”, मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळावरून संभाजीराजेंचं मोठं वक्तव्य

शरीफ मुल्ला कुटुंबीयांच्या घरात गॅसचे तीन सिलेंडर आढळून आलेत. परंतु, तिन्ही सिलेंडर तसेच शेगडीही सुरक्षित आहेत. त्यामुळे हा स्फोट सिलेंडरचा नसावा अशी दाट शक्यता असल्याने पोलीस स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी कार्यरत झाले आहेत. घटनास्थळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी व पोलीस अधिकारी, कर्मचारी तळ ठोकून असून, बारकाईने पंचनामा केला जात असल्याचे दिसते आहे.