कोकणातील गुहागर येथील समुद्रात शनिवारी सातजण बुडाल्याची दुर्देवी घटना घडली. यापैकी तिघांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले असून अन्य चौघांचा शोध सुरू आहे. या सातजणांमध्ये मुंबईच्या चेंबूर भागात राहणाऱ्या शेख कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. शेख कुटुंबिय सुट्टीसाठी गुहागर येथे राहणाऱ्या त्यांच्या चांडा या नातेवाईकांकडे गेले होते. आज दुपारी हे सर्वजण मौजमजेसाठी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण समुद्रात ओढले गेले. यामध्ये शेख कुटुंबातील पाचजण आणि चांडा कुटुंबातील दोघांचा समावेश आहे. आत्तापर्यंत महमंद शेख , सुफियाना शेक, झोया शेख यांचे मृतदेह मिळाले आहेत.

Story img Loader