अहमदनगर: पांगरमल (ता. नगर) येथील घटनेसंदर्भात पोलिसांनी झुंडबळीचा गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात अशा स्वरूपाचा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात सरपंचासहित ७ जणांना पोलिसांनी अटक केली. या सातही जणांना १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शुक्रवारी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरपंच अमोल भरत आव्हाड, महादेव किसन आव्हाड, उद्धव महादेव आव्हाड, गणेश अंबादास आव्हाड, संदीप पंढरीनाथ आव्हाड, आकाश अशोक वाकडे, अक्षय अंबादास आव्हाड (सर्व रा. पांगरमल, नगर) अशी अटक झालेल्या सात जणांची नावे आहेत.

हेही वाचा >>> विधान परिषद निवडणूक अटळ; कोणत्याही उमेदवाराकडून माघार नाही; ११ जागांसाठी १२ जण रिंगणात

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेळ्या चोरीच्या संशयावरून २० ते २५ च्या जमावाने भटक्या समाजातील कुटुंबावर कुऱ्हाडी, कोयते, लाकडी दांडक्याने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर महिलेसह तिघे जखमी झाले. एमआयडीसी पोलिसांनी हत्या, झुंडबळी (मॉब लिंचिंग), विनयभंग, अॅट्रॉसिटी आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात जखमी महिलेने फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक संपत भोसले करत आहेत.

दरम्यान, ही घटना दुर्दैवी असून, इतर आरोपींना अटक करण्यापूर्वी योग्य ती चौकशी करूनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी पांगरमल ग्रामस्थांनी अधीक्षकांना निवेदन देऊन केली. माजी सरपंच भीमराज आव्हाड, उपसरपंच कविता आव्हाड, रावसाहेब आव्हाड, राहुल सांगळे, अमित आव्हाड, नवनाथ आव्हाड, भास्कर आव्हाड, भागिनाथ आव्हाड, भरत आव्हाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.