शाळेच्‍या सहलीच्‍या बसला सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर तालुक्यात झालेल्‍या भीषण अपघातात ६ विद्यार्थ्‍यांसह चालकाचा मृत्यू होण्याची घटना आज घडली आहे. माळुंब्रा गावात अपघात झाला.
एका खासगी बसने शाळेच्या बसला समोरुन जोरदार धडक दिली. त्‍यात ७ जणांचा जागीच मृत्‍यू झाला. तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्‍त बस कोल्हापूरच्या सांगवडे माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्‍यांना सहलीसाठी घेऊन निघाली होती. शुक्रवारी रात्री कोल्हापूरहून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाली होती. रात्री एका ठिकाणी थांबली असता दुसऱ्या एका खासगी बसने धडक दिली. तुळजापूरपासून १५ किमी अंतरावर नागोबा देवस्थानाजवळ एका धोकादायक वळणावर खासगी बसच्‍या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ती बस थेट शाळेच्‍या बसला धडकली. खासगी बस एका ट्रॅव्‍हल्स कंपनीची असून, ती नागपूरहून सोलापूरला निघाली होती.

Story img Loader