संरक्षणविषयक कारभारात बरीच ‘घाण’ करून ठेवल्याची बोचरी टीका करीत संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी यापुढे संरक्षण खरेदीत ७० उत्पादने भारतीय बनावटीची असतील, असे शुक्रवारी सांगितले. ‘डेस्टिनेशन मराठवाडा’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या भाषणातील पहिला टप्पा माध्यमांची नकारात्मक मानसिकता यावरच केंद्रित होता.
मेक इन इंडिया या उपक्रमात कसे सहभागी होऊ शकतो, याची चाचपणी करण्याची उद्योजकांनी रेल्वे व संरक्षण क्षेत्रातील निर्मितीत मराठवाडय़ातील उद्योजक कसे योगदान देऊ शकतील याची माहिती देणारे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित केले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी र्पीकर बोलत होते. र्पीकर यांनी भाषणाची सुरुवातच तोमरच्या उदाहरणावरून केली. सूत्रसंचालक मुकुंद कुलकर्णी यांनी मी एम. टेक. झालो आहे, असा उल्लेख केला; पण तो तसा चुकीचा आहे. मी तो अभ्यासक्रम शिकलो आहे, पण त्याची पदवी माझ्याकडे नाही. त्यामुळे शिक्षणाच्या तोमर यादीत मी जाईन. भाषणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मला काळजीपूर्वक बोलावे लागते, याचे कारण संरक्षण खाते माझ्याकडे आहे, असे सांगत त्यांनी माध्यमांमधून वाक्य तोडून त्याची बातमी करण्याची पद्धत असल्याचे तिरसकसपणे सांगितले. नकारात्मक मानसिकता जरा जास्त झाली, असे सांगत अध्र्या भरलेल्या पाण्याच्या ग्लासचे उदाहरणही सांगितले. ४० वष्रे युद्ध झालेच नाही, अशा आशयाचे प्रकाशित झालेले वृत्त कसे चुकीचे होते, हेदेखील त्यांनी सांगितले. भाषणातील पहिल्या टप्प्यात त्यांनी माध्यमातील नकारात्मकतेवर जोर दिला. संरक्षण विभागातही ‘घाण’ करून ठेवल्याचे सांगत त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर बोचरी टीका केली. ‘घाण काढायची असेल तर घाणीत उतरावे लागते. वरून घाणीचा अंदाज येत नाही. बरीच घाण आहे. आता ती कोणी केली हे सांगणार नाही,’ असा टोला त्यांनी लगावला.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येत्या काही वर्षांत रेल्वेमध्ये साडेआठ लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याचे सांगितले. रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केलेली प्रत्येक बाब पूर्ण होईल, याचा आढावा घेत असल्याचे सांगत रेल्वेचा वेग वाढविण्यासाठी लागणारी  यंत्रसामग्री खरेदीसाठी २३ कंपन्या स्पध्रेत उतरल्या आहेत. मात्र, मंत्री म्हणून एकही टेंडर माझ्याकडे येणार नाही, अशी पारदर्शकता राखल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्योगांना पुढे जायचे असेल तर जागतिक पुरवठा साखळीत (ग्लोबल सप्लाय चेन) उतरावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री प्रभू, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार चंद्रकांत खैरे, राजकुमार धुत, मराठवाडा ऑटो क्लटरचे अध्यक्ष राम भोगले आदींची उपस्थिती होती.

Story img Loader