कर्जत तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्य़ामधील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्यामुळे शेकडो शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कर्जत तालुक्यातील २८१ शाळांपकी सत्तर शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पट २० सुद्धा नाही. काही गावातील शाळेचा पट शून्य आहे. तरीही शिक्षकांचे वेतन सुरू ठेवावे लागते. शासनाला नाहक प्रचंड आíथक भरुदड पडतो. अशा शाळा शिक्षणाच्या अधिकारांतर्गत बंद कराव्यात असा शासनाचा विचार आहे. तसा आदेश आल्यास या शाळा कधीही बंद होतील. दिवसेंदिवस पालकांचा ओढा खासगी किंवा इंग्रजी शाळांमधून आपली मुले शिकली पाहिजेत याकडे आहे. बहुतांश गावांजवळ तशा शाळा सुरू झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांना टाकण्यात पालकांची इच्छा नसते. म्हणून अशी परिस्थिती ओढावली आहे. कर्जत तालुक्यात २८१ शाळा आहेत. २१ केंद्र प्रमुख शिक्षक मंजूर असताना सतरा कार्यरत आहेत. पदोन्नती मुख्याध्यापक ३१ मंजूर असताना पन्नास कार्यरत आहेत. ६४६ उपशिक्षक मंजूर असताना ७३१ कार्यरत आहेत. १८५ पदवीधर शिक्षक मंजूर असताना केवळ ५१ पदवीधर शिक्षाकच कार्यरत आहेत. असे ८३२ शिक्षक कार्यरत आहेत. अतिरिक्त मुख्याध्यापक ३१ आहेत. अतिरिक्त उपशिक्षक ११० आहेत. एकही पदवीधर शिक्षक अतिरिक्त नाही. या उलट रिक्त मुख्याध्यापकांची संख्या १३ आहे. रिक्त उपशिक्षकांची संख्या २५ आहे आणि रिक्त पदवीधर शिक्षकांची संख्या १३४ आहे. ही आकडेवारी २०१५-२०१६ ची असल्याचे गट शिक्षण अधिकारी सुरेश डंबाये यांनी सांगितली. नुकतेच मुख्याध्यापक, शिक्षकांचे समायोजन झाल्याचेही सांगितले. २८१ शाळांपकी ७० शाळांमधील विद्यार्थीपट वीसपेक्षा कमी आहे. गारपोली गावातील शाळेचा विद्यार्थीपट शून्य आहे. अशा शाळा शिक्षणाच्या अधिकारांतर्गत बंद करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. तसे घडल्यास त्या सत्तर शाळा कधीही बंद होऊ शकतात. त्यामुळे तेथील शिक्षकांचे काय करायचे? असा प्रश्नसुद्धा समोर येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा