Anjali Damaniya in Beed : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे. त्यांनी बीडमध्ये तळ ठोकला असून तेथील अनेक अनियमित कामांसंदर्भात आवाज उठवला आहे. बीडमधील शासकीय कार्यालयात अनेक वरिष्ठ पदावर परळीतील वंजारी समाजातील लोक असल्याचा दावा त्यांनी काही पुराव्यांआधारे केला होता. यावरून आता अंजली दमानिया यांना वंजारी समाजाकडून रोष पत्कारावा लागत आहे. पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“दोन दिवसांपूर्वी मी माध्यमांशी बोलताना काही विधानं केली होती. बीडच्या वरिष्ठ पदावर सर्व वंजारी समाजाची लोक आहेत, असं मला अभ्यासातून समजलं होतं. वंजारी समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात प्रशासनात घेण्यात आलं होतं. काही काळाने त्या सर्वांना बीडमध्ये बलावण्यात आलं. हे विधान कुठेही समाजाविरोधात बोलले नव्हते. मुद्दा हा आहे की मी कधीही कोणत्याही समाजाविरोधात बोलत नसेन तर मी जर आता बोलले तर ते का बोलले? मी ट्वीटरवर दोन ट्विट्सही टाकले. भगवान बाबांसारखे संत होते, ते शैक्षिणिक, सांस्कृतिक प्रबोधन करायचे, ते नेहमी वंदनीय आहेत, मी कुठेही हा समाज कष्टाळू नाही, आळशी आहे असं एका चकार शब्दाने म्हटलं नाही. पण त्यातील माझा उल्लेख काढून काही लोकांनी समाजातील सर्व लोकांना पाठवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं. त्यामुळे मला आता सातत्याने फोन येत आहेत. मी अभ्यासपूर्वक बोलले होते. उच्च पदावरील माणसं फक्त परळीमधील का? असा माझा सवाल होता”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

हेही वाचा >> वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे

माझा नंबर फेसबुकवर टाकलाय

c

“नरेंद्र सांगळे यांचा काही वेळापूर्वी मला फोन आला होता. हा माणूस उठसूठ फोन करत सुटलाय. त्यांनी माझा फोननंबर फेसबूकवर टाकलाय. तसंच, काही पोस्ट केल्या असून खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. सुनील फड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. त्यांच्या सोशल मीडियावर ते समर्थक असल्याचं दिसतंय. माझ्याविरोधात त्यांनी अश्लील कॉमेंट्स करायला सुरुवात केली आहे. मला पहिल्या दिवशी ७०० ते ८०० फोन आले. आज चौथा दिवस आहे. मी मॉरिशअसला स्कुबा डायविंगला गेले होते. त्यातील एक फोटो फेसबूकवर टाकून अश्लील कमेंट्स केली. हे सर्व धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत”, असा दावा अंजली दमानिया यांनी केला. तसंच, यावेळी त्यांनी या पोस्टच्या छायांकित प्रती आणल्या होत्या. त्याही त्यांनी माध्यमांसमोर दाखवल्या.