सातारा: साताऱ्यात धरण क्षेत्रातील पावसाचा जोर व आवकमध्ये घट झालेली आहे.धोम धरण व उरमोडीतून नदी पात्रात विसर्ग सोडवण्याचे नियोजन पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता पुन्हा आढावा घेऊन करण्यात येणार आहे. विसर्ग सोडणे आवश्यक असलेल्या बाबत आगाऊ सुचना देण्यात येईल.

धोम  धरणाची पाणी पातळी ७४२.२९ मीटर आहे व एकूण पाणी साठा ७०.९टक्के आहे. कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी  पाण्याचा विसर्ग.दहा हजार क्युसेक्स वरुन कमी करुन एकूण विसर्ग ५५०० क्युसेक्स करणेत आला आहे.हा विसर्ग आवकनुसार त्यामध्ये कमी जास्त करणेत येईल.कृष्णा,वेण्णा  नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा  कार्यकारी अभियंता सिंचन विभाग , सातारा यांनी दिला आहे.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?

हेही वाचा >>>Sharad Pawar : “मला माझ्या बोटावर विश्वास, माझं बोट कोणाच्याही हातात देत नाही”, शरद पवारांकडून मोदींची फिरकी

 बोपर्डी येथे गाढवे यांच्या घराची भिंत कोसळली. कुसुंबी केळघर रस्त्यावर गरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. महाबळेश्वर येथे घरांची पडझड झाली आहे.  आज जिल्ह्यातील सर्व शाळा बंद होत्या.भैरवगड घाटातील दरड काढण्यात येत आहे. ठोसेघर घाटातील रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे

मौजे बोंडारवाडी येथे अतिवृष्टीमुळे भुस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात भराव वाहून गेला आहे पाण्याची  पाइपलाइन तुटली आहे.त्यामुळे गावचा पाणीपुरवठा बंद आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी संभाव्य धोका टाळण्यासाठी पूरप्रवण व दरडग्रस्त महाबळेश्वर जावळी पाटण तालुक्यातील सुमारे सातशे लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.  कण्हेर आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने  लोकांना सतर्क राहण्याचा सूचना  जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या आहेत.ते सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

जिल्ह्यात सरासरी ४३.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.दि १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी६३६.५मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी मि.मी.मध्ये असून (कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे)सातारा ४८.२ (५६८.६), जावली-मेढा ९९ (१११०.१), पाटण ४०.७ (९४२.३), कराड २६.९(५८३.१), कोरेगाव४६.८ (४८४.२), खटाव – वडूज २३.१ (३७१), माण – दहिवडी १२.८ (२८८.४), फलटण २०.२(३१९.८), खंडाळा ३१.७(२६०.३), वाई ६१.७ (५७७.२), महाबळेश्वर.२७९.६(३४६९.२०) या प्रमाणे पाऊस झाला आहे.