रत्नागिरी: दापोली-हण्र मार्गावरील आसूद जोशीआळीजवळ मॅगझीमो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या टकरीमध्ये मॅगझीमो चालक अनिल (बॉबी) सारंग यांच्यासह ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ६ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर दापोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला. अनिल हे मॅगझीमो (एमएच-०८-५२०८) घेऊन दापोलीतून आंजर्लेकडे जात होते. आसूद जोशीआळी येथील वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकवर मॅगझीमो आदळली. ट्रक वेगात असल्यामुळे मॅगझीमो रस्त्याच्या डाव्या बाजूला फरपटत काही अंतरावर गेली. हा अपघात एवढा भयानक होता की, मॅगझीमोचा चक्काचूर झाला. या गाडीतील पाच जण जागीच, तर दोघांचा रुग्णालयात आणि एका महिलेचा डेरवण येथे नेत असताना मृत्यू झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा