कुडाळ (ता. मेढा) येथे होलसेल किराणा दुकानाचे शटर मध्यरात्रीच्या सुमारास कटावणीने तोडून सुमारे आठ लाख रुपयांची रक्कम लंपास केली.
सारडा यांची कुडाळ येथे बाजारपेठेत तीन मजली इमारत असून खाली दुकान आणि वरच्या मजल्यावर सारडा राहतात. व्यापा-यांचे पसे देण्यासाठी त्यांनी बँकेतून आणले होते. रात्री दुकान बंद करून ते वरच्या मजल्यावर गेले होते. मध्यारात्री कटावणीने शटर तोडून  दुकानातील लोखंडी कपाट तोडून ही रक्कम लांबविली. अधिक तपास रवींद्र तेलतुबडे करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 lakh stolen from shop