8 वर्षांचा एक मुलगा मोबाइलवर गेम खेळत होता, त्याचवेळी मोबाइलचा स्फोट झाल्याने या मुलाला त्याची चार बोटं गमवावी लागली आहेत. नांदेडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मुखेड तालुक्यातील जिरगा गावात ही घटना घडली. श्रीपत जाधव या शेतकऱ्याचा हा मोबाइल होता. टीव्हीवर या मोबाइलची जाहिरात पाहिल्यावर त्यांनी हा मोबाइल ऑर्डर करून मागवला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

I Kall K-72 या कंपनीचा हा मोबाइल होता. या मोबाइलची किंमत 1500 रुपये होती. तसेच या मोबाइलवर एक घड्याळही फ्री मिळालं होतं. या शेतकऱ्याने एकूण तीन फोन विकत घेतले होते. त्यातलाच हा एक फोन होता. श्रीपत जाधव यांचा आठ वर्षांचा मुलगा या मोबाइलवर गेम खेळत होता. तेवढ्यात या मोबाइलचा स्फोट झाला. या घटनेत प्रशांतला त्याची चार बोटं गमवावी लागली. प्रशांतच्या हातात मोबाइलचा स्फोट झाला त्यानंतर प्रशांतला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याची बोटं वाचू शकली नाहीत.