सोलापूर : शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक ओडिसा येथील जगन्नाथ पुरी मंदिराच्या दर्शनासाठी बुधवारी सकाळी एका विशेष रेल्वेने रवाना झाले. शासन कृपेने घडणाऱ्या जगन्नाथ पुरी दर्शनाच्या निमित्ताने या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या वेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी पिसाळ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पर्यटक ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.

सहा दिवसांसाठी निघालेल्या या धार्मिक पर्यटनाचे नियोजन सामाजिक न्याय आणि विशेष साह्य विभागाने केले आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना घेऊन निघालेल्या विशेष रेल्वे गाडीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे उपस्थित होत्या. या ज्येष्ठ नागरिकांसोबत वैद्यकीय अधिकारी व परिचारिकावृंदासह दहा काळजीवाहक आहेत.

देशातील हिंदू धर्मात चारधाम यात्रांसह अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मीयांची मोठी धार्मिक तीर्थस्थळे आहेत. या तीर्थस्थळांना आयुष्यात एकदा तरी दर्शनासाठी जाण्याचे बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. या अनुषंगाने शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना हाती घेतली आहे.षयी आक्षेपार्ह शब्द, वक्तव्ये केली जात आहेत. महापुरुषांबाबत चित्रपट बनवताना व्यावसायिक गोष्टींच्या नावाखाली चुकीचे दाखवले जाते. याला अठकाव घालण्यासाठी केंद्राने कायदेशीर कारवाई करणारा कायदा तयार करावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकूणच जीवनकार्य आणि स्वराज्यनिर्मितीचे योगदान जागतिक स्तरावर नेण्यासाठी, भावी पिढ्यांना सतत प्रेरणा मिळण्यासाठी, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक तयार करावे अशीही मागणी त्यांनी या वेळी केली.

Story img Loader