मार्च २०१४ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत सांगली जिल्ह्याचा निकाल ९०.९१ टक्के लागला असून, पास होणा-यांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील १८ शाळांतील विद्यार्थी १०० टक्के उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात ३२ हजार ७०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापकी २९ हजार ७३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १४ हजार ४६१ पकी १३ हजार ९०५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.
    मार्च १४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज इंटरनेटवर जाहीर करण्यात आला. सांगली जिल्ह्यात १८ शाळांनी निकालात शंभरी गाठली आहे. यामध्ये आटपाडी तालुक्यातील रंगलाल हायस्कूल, घाणंद हायस्कूल, जत तालुक्यातील शपन गुरुजी बेलोंडगी, श्यामराव कदम गुगवाड, खानापूर तालुक्यातील जीवन प्रबोधिनी विटा, बुधगाव येथील भाऊसाहेब कुडाळे व जिजामाता गर्ल्स हायस्कूल, पलूस तालुक्यातील किलरेस्कर हायस्कूल किलरेस्करवाडी, तासगाव तालुक्यातील पंचक्रोशी बोरगाव, गुरुदेव दादोजी कोंडदेव सनिक शाळा, मानेपाटील विसापूर, वाळवा तालुक्यातील व्ही. एस. हायस्कूल आष्टा, कुपवाड येथील नव कृष्णा व्हॉली, आर. पी. पाटील हायस्कूल, न्यू हायस्कूल यशवंतनगर, वॉन्लेसवाडी हायस्कूल, हजरापीर उर्दू गर्ल्स हायस्कूल मिरज या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
    तालुकानिहाय निकालाची टक्केवारी- आटपाडी : ९३.७६, जत :  ९०.२७, कडेगाव ९२.६९, कवठेमहांकाळ ८५.३९, खानापूर ९२.९५, मिरज ९५.०३, पलूस ९५.५८, सांगली ८८.३६, शिराळा ८८.२७, तासगाव ९२.२२ आणि वाळवा ९२.०६.
    जिल्ह्यात विज्ञान शाखेचे ९४.३९, कला शाखेचे ८६.९६ वाणिज्य शाखेचे ९१.१५ तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ९०.१५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात विशेष श्रेणीमध्ये १३३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथमश्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १० हजार ९६ आहे. तर द्वितीय श्रेणी १६ हजार ८९० विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. पास श्रेणीमध्ये १४०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.