कौतिकराव ठाले- पाटील यांची टीका; सदस्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शफी पठाण, नागपूर</strong>

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यावरून साहित्य महामंडाळावर जी टीका होत आहे ती असहय आहे. ही नामुष्की केवळ आणि केवळ महामंडळाच्या अध्यक्षांच्या स्वयंभू शहाणपणामुळे ओढवली आहे, अशी टीका महामंडळाचे पूर्वाध्यक्ष व वर्तमान सदस्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केली.

कौतिकराव म्हणाले, वर्तमानपत्रांतून आलेल्या बातम्या वाचून धक्का बसला. निमंत्रण रद्द करण्याआधी श्रीपाद जोशी आमच्याशी बोलले असते तर आम्ही, निदान मी तरी त्यांना याबाबत विरोध केला असता. अर्थात त्याचा काहीही उपयोग झाला नसता हे वेगळे! परंतु जोशींच्या या विचित्र निर्णयामुळे महामंडळाचे इतर सदस्य निष्कारण टीकेचे धनी ठरत आहेत. नयनतारा सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिकेला आधी निमंत्रण देवून नंतर तो नाकारण्याचा निर्णय धिक्कार करावा असाच आहे. महामंडळातील सदस्यांना विश्वासात न घेता जोशींनी हा निर्णय घेतला आहे. सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या विषयावरून  आयोजक मंडळी श्रीपाद जोशींना नागपुरात भेटली. जोशींनी किमान फोनवरून तरी महामंडळाच्या  सदस्यांशी चर्चा करायला हवी होती, असे ठाले म्हणाले.

१० जानेवारीच्या बैठकीत जाब विचारणार

महामंडळ अध्यक्षांच्या या स्वयंभू शहाणपणाला नेमके काय कारण होते, याचा जाब  १० जानेवारीला यवतमाळात होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत विचार असल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले.

निर्णय चुकीचाच, पण बहिष्कार नको

नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे ही मोठीच चूक आहे. साहित्य विश्वाला अप्रतिष्ठीत करणारी आणि पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे. परंतु यासाठी एकूणच संमेलनाला वेठीस धरणे योग्य नाही. संमेलनावर बहिष्कार नकोच.

– मिलिंद जोशी, सदस्य, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

सदस्य अनभिज्ञच

आज कधी नव्हे इतकी महामंडळाची बदनामी झाली. याला श्रीपाद जोशी जबाबदार आहेत. महामंडळाच्या सदस्यांशी चर्चा करणे आवश्यक होते. पण, जोशी नेहमीच सदस्यांना अंधारात ठेवतात हे योग्य नाही.

– दादा गोरे, सदस्य, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

आरोप-प्रत्यारोप सुरूच

याबाबत आयोजन समितीतील पद्माकर मलाकापुरे यांना विचारणा केली असता त्यांनी या सर्व प्रकाराला महामंडळच जबाबदार असल्याचे सांगितले. नयनतारा सहगल यांचे नाव महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीच सूचवले होते. त्यांचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णयही त्यांना विचारूनच घेण्यात आला, असे मलकापुरे म्हणाले. आता काही निमंत्रित सहगल यांना पुन्हा सन्मानाने बोलावले तरच संमेलनाला येऊ असे सांगत आहेत. याबाबतचा निर्णयही महामंडळालाच घ्यायचा आहे. परंतु अद्याप त्याबाबत वा नवीन उद्घाटक निवडण्याबाबत महामंडळाकडून आम्हाला कुठलीही सूचना मिळालेली नाही, असेही मलाकापुरे यांनी स्पष्ट केले.

जोशी यांच्या सांगण्यावरूनच निमंत्रण रद्द -कोलते

नयनतारा सहगल यांचे नाव महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीच सुचवले होते. त्यांचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णयही त्यांच्या सांगण्यावरूनच घेण्यात आला, असे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी स्पष्ट करून या सर्व प्रकरणाबाबत महामंडळालाच जबाबदार धरले आहे. जोशी यांनी निमंत्रण रद्द  करण्याचा निर्णय हा आयोजकांचा होता असे सांगितले होते.दरम्यान, झालेल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त करीत कोलते यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व निमंत्रितांनी  संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.