सांगली : सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे केनान शुगर कंपनीत अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील ९५ नागरिकांची ऑपरेशन कावेरीअंतर्गत सुटका करण्यात आली असून, हे नागरिक बुधवारी मुंबईत पोहोचले.

सुदानमध्ये यादवी युद्ध सुरू असून यामुळे युद्धस्थळापासून ४०० किलोमीटर अंतरावर केनान शुगर कंपनीमध्ये सांगली जिल्ह्यातील शंभर ते १२० नागरिक अडकले आहेत. जिल्हा प्रशासन या नागरिकांंच्या संपर्कात होते. अडकलेल्या ९५ नागरिकांची पहिली तुकडी वायूसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान सौदी अरेबियातील जेधाह मार्गे मायदेशी मुंबईत सुखरूप पोहोचली.

Lahori bar nagpur, nagpur hit and run case,
नागपूर ‘हिट अ‍ॅण्ड रन’मुळे चर्चेत आलेल्या लाहोरी बारवर वरदहस्त कुणाचा?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Manipur Curfew
Curfew  in Manipur : आता घराबाहेर पडण्यासही मनाई; मणिपूरमध्ये नेमकी परिस्थिती काय?
security tightened in manipur following fresh violence
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ड्रोन हल्ल्यांविरोधात इम्फाळमध्ये मोर्चा, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा
russia missile strike on ukraine
Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी
protest against netyanahu in israel
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये आंदोलन पेटले; कारण काय? मारले गेलेले सहा ओलिस कोण होते? त्यांची हत्या का करण्यात आली?
minorities targeted in bjp ruled states deeply troubling congress slams bulldozer action in mp
बुलडोझर न्याय अमान्य! अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे व्यथित करणारे; घरे पाडणे थांबवण्याची काँग्रेसची मागणी
Family members appeal not to believe rumors about Badlapur harassment case
त्या चिमुकल्यांची तब्येत व्यवस्थित; अफवांवर विश्वास ठेवू नका, सहकाऱ्यांचे आवाहन

हेही वाचा – “नाना पटोलेंना त्यांचा पक्ष…”, ‘त्या’ टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “राहुल गांधी त्यांच्यापेक्षा…!”

जिल्हाधिकारी कार्यालय सांगली मार्फत झालेल्या पाठपुराव्यानुसार सुदान देशातील शुगर फॅक्टरीत अडकलेल्या ३७० भारतीयांपैकी ९५ लोकांची पहिली बॅच भारताकडे आली आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील तानाजी पाटील, जितेंद्र डोळ, सागर जाधव, संदीप खराडे, राजू भुजबळकर, राजाराम पाटील, श्रीकांत पाटील यांचा समावेश आहे.

हेही वाचा – सांगलीत बारा लाखांचे खवले जप्त, दोघांना अटक

यातील तानाजी पाटील (रा. सुर्यगांव, ता. पलूस) यांच्याशी संपर्क झाला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुदानमध्ये अडकलेले नागरिक सुखरूप आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सातत्याने नागरिकांच्या संपर्कात आहे. भारतीय दुतावास सर्वोतोपरी मदत करत असून नागरिकांना आणीबाणीचे पारपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. भारतीय वायूसेनेच्या विमानाने आम्हाला भारतात आणले असून आमचा प्रवास सुखरूप झाला आहे. आज सायंकाळी दुसरी बॅच सुदानमधून बाहेर पडत असून त्यात जिल्ह्यातील १५ ते २० नागरिकांचा समावेश असेल. जवळपास ४०० पैकी ३०० नागरिक सुदानमधून बाहेर पडणार असून ७० ते ७५ नागरिक स्वत:च्या जबाबदारीवर सुदानमध्येच राहण्याच्या तयारीत आहेत.