Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 Delhi Highlights : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरुवात झाली आहे. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं आहे. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली असून देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. विज्ञान भवनात संमेलनाचे उद्घाटन झालं आहे. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर आहेत. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. https://www.youtube.com/live/raJdAnVFa5w?si=xiHJxDli_Y_UAaBR तसेच राज्यातील साहित्यिक या सोहळ्यास उपस्थित आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 Delhi LIVE Updates : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊयात.

20:12 (IST) 21 Feb 2025

VIDEO : आधी खुर्चीवर बसवलं, नंतर शरद पवारांना पाण्याचा ग्लास दिला, पंतप्रधान मोदींच्या कृतीने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिल्लीत आजपासून सुरुवात झाली आहे. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत पाहायला मिळाली. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर आहेत. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं. याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना खुर्चीवर बसण्यासाठी मदत केल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नव्हे तर आदराने पाण्याचा ग्लास देखील भरून दिला. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सविस्तर वाचा

19:09 (IST) 21 Feb 2025

देशात साहित्याला खूप महत्त्व : पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>

"भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नाही. भाषांनी नेहमीच एकमेकांवर प्रभाव टाकला आहे आणि समृद्ध केले आहे.अनेकदा, जेव्हा भाषेच्या आधारावर विभागणी करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा आपला सामायिक भाषिक वारसा जोरदार प्रतिवाद प्रदान करतो. या सर्व समाजाशी दुरावण्याची आणि समृद्धीची जबाबदारी स्वीकारण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळेच आज आपण मराठीसह सर्व प्रमुख भाषांमध्ये शिक्षणाचा प्रसार करत आहोत, ही मानसिकता मराठीच्या कमतरतेमुळे बदलली आहे. देशात साहित्याला खूप महत्त्व आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js

18:57 (IST) 21 Feb 2025

मराठीत शूरता आणि वीरता देखील आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

"भाषा समाजाच्या निर्माणासाठी महत्वाची भूमिका निभावत आहे. मराठीत शूरता आणि वीरता देखील आहे. मराठी सौंदर्य आहे आणि संवेदना आहे. समानता आहे आणि समरस्ता देखील आहे. आध्यात्मताचे स्वर देखील आहेत आणि आधुनिकतेचे स्वर देखील आहेत. जेव्हा भारताला आध्यात्मिकतेची गरज होती तेव्हा महाराष्ट्रातील अनेक संतांनी समाजाला नवी दिशा देण्याचं काम केलं आहे", असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

18:46 (IST) 21 Feb 2025

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक वटवृक्षाप्रमाणे १०० वर्ष साजरे करत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

"मराठी साहित्य संमेलन अशा वेळी होत आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाले आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे ३०० वर्ष पूर्ण झाले आहेत. तसेच आपल्याला या गोष्टींचा गर्व आहे की महाराष्ट्राच्या धर्तीवर १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात झाली होती. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक वटवृक्षाप्रमाणे आपले १०० वर्ष साजरे करत आहे. वेदांपासून ते स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंत भारताच्या परंपरा आणि संस्कृती नव्या पिढींपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या १०० वर्षांपासून करत आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

https://www.youtube.com/live/raJdAnVFa5w?si=xiHJxDli_Y_UAaBR

18:45 (IST) 21 Feb 2025

मराठी भाषा ही अमृताहूनी गोड आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

"आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला आहे. मी जेव्हा मराठी भाषेबाबत विचार करतो. तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके, म्हणजे मराठी भाषा ही अमृताहूनी गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रति माझं प्रेम आहे. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

18:28 (IST) 21 Feb 2025

“मराठी सारस्वतांना माझा नमस्कार”, म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मराठीत भाषण

दिल्लीत आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं आहे. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली आहे. देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर आहेत. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भाषण करताना आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. “मराठी सारस्वतांना माझा नमस्कार”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात केली.

सविस्तर वाचा

18:06 (IST) 21 Feb 2025

"मराठी सारस्वतांना माझा नमस्कार", म्हणत मोदींचं मराठीत भाषण

"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचं भाषण झालं. तेव्हा मी म्हटलं की फारच छान, तर त्यांनी मला गुजरातीमधून उत्तर दिलं. मला पण गुजराती अवडाची असं त्यांनी म्हटलं. देशाच्या आर्थिक राजधामीमधून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व सारस्वतांना माझा नमस्कार", असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी केली.

https://www.youtube.com/live/raJdAnVFa5w?si=xiHJxDli_Y_UAaBR

17:57 (IST) 21 Feb 2025

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संमेलनाध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांच्या भाषणाचं कौतुक

"खरं म्हणजे संमेलनाध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचं भाषण ऐकल्यानंतर त्या भाषणामध्येच आपण राहावं असं आपल्या सर्वांना वाटतंय. तसेच आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण देखील आपल्याला ऐकायचं आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन दिल्लीत होत आहे. तसेच या संमेलनाला पंतप्रधान मोदी देखील उपस्थित आहेत", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

https://www.youtube.com/live/raJdAnVFa5w?si=xiHJxDli_Y_UAaBR

17:48 (IST) 21 Feb 2025
"'त्या' दिवशी मराठी भाषा जन्माला आली असेल...", संमेलनाध्यक्षा डॉ.तारा भवाळकर

"जर भाषा बोललं तर भाषा जिवंत राहते. फक्त पुस्तकातून आणि ग्रंथांमधून भाषा जिवंत राहत नाही. त्यामुळे भाषा ही जैविक आहे. महाराष्ट्राला पांडुरंगाचे चिंतन करायला लावणारी मराठी भाषा आहे. ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आहे. ज्या दिवशी आईने आपल्या बाळासाठी पहिली ओवी म्हटलं असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली असेल. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण कोथिंबिरी अवघा झाला माझा हारी , असं म्हणाले सावता माळी त्यांनी ही भाषा जिवंत ठेवली", असं संमेलनाध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांनी म्हटलं आहे.

https://www.youtube.com/live/raJdAnVFa5w?si=NLqoVe4SRM9gNuat

17:18 (IST) 21 Feb 2025
मराठी साहित्य संमेलनाचा अमृत अनुभव घेण्यासाठी आपण यमुनेच्या तिरावर जमलो, याचा मला अभिमान : शरद पवार

"मराठी माणूस हा अटेपार झेंडा फडकावताना दिसतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अमृत अनुभव घेण्यासाठी आज आपण यमुनेच्या तिरावर जमलो आहोत याचा मला अभिमान आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान मोदी हे उपस्थित आहेत याचा मला आनंद आहे. सर्वांनी एका गोष्टीचा पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका बजावली याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. १९५४ साली पहिल्यांदा दिल्लीत मराठी साहित्य संमेलन झालं. तेव्हा पंडिच नेहरु यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं होतं", असं शरद पवार यांनी यावेळी बोलताना आपल्या भाषणात म्हटलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

17:04 (IST) 21 Feb 2025

संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर म्हणाल्या, माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? मोदींचे नाव न घेता…

"आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न करत संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यानंतर दुसऱ्या उद्घाटन सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

सविस्तर वाचा

17:03 (IST) 21 Feb 2025
दिल्ली आता दूर नाही असं सांगणारं हे मराठी साहित्य संमेलन : उषा तांबे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी म्हटलं की, "दिल्ली दूर आहे असं पूर्वी म्हटलं जायचं. पण आता दिल्ली दूर नाही असं सांगणारं हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. अनेक चाकोरीबाहेरील कार्यक्रम यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी मराठीतील अनेक पुस्तके देखील या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत", असं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी म्हटलं.

https://www.youtube.com/live/raJdAnVFa5w?si=NLqoVe4SRM9gNuat

16:48 (IST) 21 Feb 2025
दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरुवात झाली आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पडलं आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.

https://platform.twitter.com/widgets.js

16:39 (IST) 21 Feb 2025
मराठी साहित्य संमेलनासाठी मोठ्या संख्येने साहित्य रसिक उपस्थित

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरुवात झाली आहे. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात पार पडणार आहे. या संमेलनासाठी साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतरचे साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून मोदी दुसरे पंतप्रधान असणार आहेत.

https://www.youtube.com/live/raJdAnVFa5w?si=NLqoVe4SRM9gNuat

16:09 (IST) 21 Feb 2025

साहित्य संमेलनाला कोणते नेते उपस्थित राहणार?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरुवात झाली आहे. या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात पार पडणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील ख्यातनाम साहित्यिकांसह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, सुशील कुमार शिंदे, मंत्री उदय सामंत आणि आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

15:40 (IST) 21 Feb 2025

साहित्य संमेलनापासून गडकरी लांब का?

देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली असून देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. मात्र, साहित्य संमेलनापासून नितीन गडकरी लांब असल्याचं बोललं जात आहे.

सविस्तर वाचा

15:38 (IST) 21 Feb 2025

दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरुवात झाली आहे. या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात पार पडणार आहे. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली आहे. साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 Delhi LIVE Updates

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊयात, (फोटो-संग्रहित छायाचित्र)