गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात शुक्रवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातील उमानूर ते झिंगानूर परिसरात असून तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा- जतजवळ ऊसतोड मजूरांचा ट्रक पलटी; १५ जण जखमी

Pune Municipal Corporation cleanliness drive on pedestrian bridges Pune news
अडलेले ‘पाऊल’ पडले पुढे! पादचारी पूल आवश्यक ठिकाणीच; असलेल्या पुलांवर महापालिकेची स्वच्छता मोहीम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
mahakumbh 2025 shocking video Chaos At Jhansi Railway Platform As Passengers Rushing To Board Maha Kumbh Special Train Fall On Track
Mahakumbh 2025: बापरे! महाकुंभला जाताना रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, कोण रुळावर पडलं तर कोण चेंगरलं; थरारक VIDEO समोर
JAPAN Earthquake
Japan Earthquake : जपानमध्ये ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी
part of house collapse in Jogeshwari, house Jogeshwari,
जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून पाच जण जखमी
Image Of Kannauj Building Collapse
Kannauj Building Collapse : उत्तर प्रदेशात रेल्वे स्थानकावर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सिरोंचा तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे हादरे बसले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरात होते. मात्र, भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू उमानूर आणि झींगानूरमधील टेकडी परिसरात असल्याचा अंदाज आहे. हा परिसर तेलंगणा राज्याला लागून असल्याने तेथेही काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अद्याप प्रशासनाकडून अधिकृतपणे माहिती प्राप्त झालेली नाही. धरणक्षेत्रात भूकंपाचा धोका अधिक असतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर बांधण्यात आलेले धरण या भूकंपाला कारणीभूत आहे काय, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. काही वर्षांपूर्वीदेखील या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते, हे विशेष.

Story img Loader