सातारा: पुणे सातारा महामार्गावर पाचवड (ता.वाई) गावच्या हद्दीत त्र॔बकेश्वरहुन पलुसकडे जाणाऱ्या भरधाव  बसला व दुचाकीला अज्ञात मोटारीने चकवा दिल्याने दुचाकीस्वार बस खाली येऊन दुचाकी जळाल्याने दुचाकी स्वार जळून खाक झाला. यामुळे बसला ही आग लागली. प्रसंगावधान राखून बस चालकाने बस प्रवाशांना खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्र्यंबकेश्वर पलूस बस सातारा कडे जात असताना पाचवड गावच्या हद्दीत डॉ भट यांच्या पेट्रोल पंपा समोर अज्ञात मोटारीने पाठीमागून येणाऱ्या दुचाकीला आणि बसला चकवा दिल्याने दुचाकी चालक बस खाली आला. यामुळे दुचाकी भरधाव बस बरोबर दोनशे फूट पुढे घसटत गेली.  त्यामुळे दुचाकीची पेट्रोलची टाकी फुटून दुचाकी स्वार जळाला. त्याबरोबरच एसटी बसला ही आग लागली. तात्काळ भुईंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाने आग विझवली.  बस चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना संकटकालीन दरवाजातून खाली उतरवल्याने मोठा  अनर्थ टळला. बस मधून ३५ प्रवासी प्रवास करत होते. ही घटना बुधवारी सायंकाळी उशिरा घडली. या घटनेची नोंद भुईंज पोलिसात झाली आहे