सांगली : महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. विनापरवाना प्रचार पदयात्रा केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निवडणुकीतील हा पहिलाच आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – सातारा : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे करणार मोदींकडे शिफारस

हेही वाचा – “मविआ सरकार फडणवीसांना अटक करणार होतं”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे म्हणाले, “संजय राऊतांनी…”

उबाठा शिवसेनेचे उमेदवार पाटील यांनी आपल्या निवडणूक प्रचारासाठी मिरज तालुक्यातील खटाव, बेडग या गावी लोकांच्या भेटी घेण्यासाठी पदयात्रा काढली. मात्र, या पदयात्रेसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. यामुळे निवडणूक आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार भरारी पथकातील प्रमुख सुरेश चव्हाण यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दरम्यान, निवडणूक प्रचार करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या दुचाकीच्या इंधनाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून इम्तियाज ईकबाल पठाण यांने काँग्रेस भवनसमोर बसलेल्या अशोक माळी यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार सांगली शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against mahavikas aghadi candidate chandrahar patil for violating the code of conduct ssb