सांगली महापालिका क्षेत्रातील विश्रामबाग परिसरित एका दांपत्याला करोना संसर्ग झाल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. दोन महिन्यानंतर करोना रुग्ण आढळला असून जेएन-१ विषाणु संसर्ग आहे का याची पडताळणी करण्यासाठी रुग्णांच्या स्वॅबचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले.

महापालिका क्षेत्रात गुरुवारपासून चाचणी सुरु करण्यात आली. यात दोघे कोरोनाबाधित आढळले. सर्दी, ताप असल्याने त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यांची प्रकृती चांगली आहे. रुग्णांची करोना चाचणी सकारात्मक आली असली कोणतीही लक्षणे नाहीत. दोन महिन्यांपूर्वी महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण आढळला होता.

हेही वाचा… Maharashtra News Live : “बाळासाहेब ठाकरे यांनाही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण दिलं नसतं, कारण…”, संजय राऊतांचं विधान

दरम्यान, गुरुवारी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुपारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीतही याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली.

Story img Loader