अलिबाग: मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आंबेनळी घाटात आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने पोलादपुर महाबळेश्वर दरम्यान वाहतुक ठप्प झाली होती. सकाळी दरड हटविण्याचे काम पुर्ण करून या मार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली. महाबळेश्वर आणि पोलादपूर परिसरात सुरु असेलेल्या संततधार पावसामुळे, आंबेनळी घाटात कालिका मंदीरा जवळ मंगळवारी रात्री ही दरड कोसळली. याबाबतची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र रात्रीच्या काळोखात दरड हटविण्याचे काम करणे शक्य नसल्याने, दोन्ही बाजूची वाहतूक सकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुधवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पहाणी करून, दरड हटवण्याचे काम  तातडीने सुरु केले. संततधार पावसामुळे या कामात अडचणी येत होत्या. पाण्यासोबत लहान मोठे दगड आणि मातीचे ढिगारे ओघळून खाली येत होते. जेसिबी मशीनच्या साह्याने हे ढिगारे हटवण्याचे काम सुरु करण्यात आले. रस्ता मोकळा झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली. दरम्यान जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने घाट मार्गावरून प्रवास करतांना वाहन चालकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.