औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. भुमरे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील युवराज शिवाजीराव चावरे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा- खळबळजनक : मुंबई-गोवा महामार्गावर नदीपात्रात सापडली स्फोटके
शेतकरी असलेले युवराज चावरे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, १० नोव्हें. रोजी सकाळी ९.२१ च्या दरम्यान पालकमंत्री भुमरे यांचा व्हॉटसअॅप कॉल आला. तुला माज आला का? पाचोडला आल्यावर तुला दाखवतो. नाहीतर तुला घरी येऊन मारतो. तू सोशल मीडियावर आमच्याविरोधात का पोस्ट करतो. आम्हाला का विरोध करतो, असे म्हणत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. तुझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करेल. तुला जेलमध्ये टाकेल. मी पालकमंत्री आहे. तुला सोडणार नाही, अशा भाषेत पालकमंत्री बोलत होते, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला. या कॉलची सायबर क्राईम शाखेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करत याप्रकारामुळे आपण व आपले कुटुंबीय भयभीत झालो, असेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल नाही