नाशिक शहरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पूर्ववैमन्यस्यातून हा हल्ला झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध झाले आहे. शनिवारी रात्री हा हल्ला झाल्याचे सुत्रांकडून कळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुत्रांच्या माहितीनुसार, शहरातील मिरकर कॉम्प्लेक्समध्ये सुरेश दलोड यांचे कार्यालय आहे. आपल्या कार्यालयात ते बसले असताना तेथे तिन जणांनी प्रवेश केला. या तिघांनी येथे पोहोचताच दलोड यांनी मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान, त्यांना वाचवण्यासाठी धावलेला त्यांचा मुलगा आणि आत्येभावालाही या तिघांनी बेदम मारहाण केली. यानंतर हे तिघेही हल्लेखोर फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.