सातारा : सज्जनगड ठोसेघर मार्गावर बोरणे घाटात ‘सेल्फी’ काढताना खोल दरीत पडलेल्या युवतीला वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि ‘छत्रपती शिवेद्रसिंहराजे रेस्कु टीम’ला यश आले. या अपघातात युवती गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. या युवतीचे नाव समजू शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सज्जनगड ठोसेघर मार्गावरील बोरणे गावच्या हद्दीतील ‘मंकी पॉईंट’ परिसरात एक युवती सेल्फी काढताना दरीत कोसळली . सातारा शहरानजीकच्या डोंगर भाग परिसरातील हा दुसरा अपघात आहे . ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांनी बचाव कार्य वेगाने राबवून दरीत पडलेल्या युवतीला वाचवले. पुढील उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>जरांगे पाटील यांचा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणार, नारायण राणेंचा इशारा

या घटनेची माहिती कळताच ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी प्रवीण चव्हाण, प्रथमेश जानकर, समाधान काकडे, प्रतीक काकडे, रामचंद्र चव्हाण, तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले . खोल दरीमध्ये दोरखंड टाकून युवतीला सुखरूपपणे बाहेर काढले. दरम्यान पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे