कराड : प्रेमविवाहासाठी युवतीस पळून जाण्यास मदत केल्याच्या रागातून लाकडी दांडक्याने केलेल्या अमानुष मारहाणीत एकाचा मृत्यू होताना, दोघे गंभीर जखमी झाले. या गुन्ह्यात दहा जणांचा सहभाग समोर आला आहे. तर, पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्ली (ता. कराड) घाटात सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. त्यात खून झालेल्या इसमाचे नाव जनार्दन महादेव गुरव (रा. राजमाची, ता. कराड) असे आहे, तर प्रवीण पवार, विश्वास पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. या गुन्ह्यात बाबासाहेब पवार, विकास पाडळे व विनायक चंदुगडे अशी पोलीस कोठडी मिळालेल्या तिघांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हजारमाची (ता. कराड) येथील युवती बेपत्ता आहे. त्या युवतीला राजमाची (ता. कराड) येथील युवकाने पळवून नेल्याचा युवतीच्या कुटुंबाला संशय आहे. त्या कारणावरुन युवतीचे नातेवाईक चिडून होते. या रागातून त्यांनी संशय असलेल्या युवकाच्या कुटुंबातील व संबंधित काहीजणांना गुहागर-विजापूर मार्गावरील सुर्ली घाटात निर्जनस्थळी नेवून आमची मुलगी कुठे आहे? अशी विचारणा करून, लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.या प्रकरणी शेखर उर्फ उदय भीमराव पवार, बाबासाहेब भीमराव पवार, गौरव बाबासाहेब पवार तिघेही (रा. हजारमाची, ता. कराड) व बाबासाहेब पवार यांचा सैदापूर (ता. कराड) येथील नातेवाईक (नाव स्पष्ट झाले नाही) आणि त्यांच्यासोबत असलेले अनोळखी सहाजण अशा  एकूण दहा जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असून, इतरांचा शोध सुरु आहे.