शेजाऱ्याच्या पाळीव प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून ठाण्यातील एका व्यक्तीने पर्शियन माजरीला 16 व्या मजल्यावरुन खाली फेकून देत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवराम पांचाळ असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, मांजर अनेकदा आपल्या फ्लॅटमध्ये शिरकाव करत असे यामुळे आपल्या बाळाच्या सुरक्षेची सारखी चिंता वाटत असे. पोलिसांनी पांचाळला अटक केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोनू असं नाव असणाऱ्या या मांजरीच्या मृत्यूमुळे तिचे 65 वर्षीय मालक गनी शेख यांना धक्का बसला आहे. कासारवडवली येथील एव्हरेस्ट कंट्रीसाइड कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे.

इमारतीखाली रक्ताच्या थारोळ्यात मांजरीचा मृतदेह पडला होता. शेख यांच्या घरी तिचा मृतदेह नेला असता इतर प्राण्यांनी तिला गराडा घातला. शेख यांच्या घऱात अजून आठ पर्शियन मांजरी आणि एक लॅबोरेडर आहे. सर्वांनी सोनूला गराडा घातला होत. कोणीही तिला सोडायला तयार नव्हतं अशी माहिती शेख यांच्या शेजाऱ्याने दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने शिवराम पांचाळला हातात मांजरीला घेऊन जात असताना पाहिलं होतं. मांजर त्याच्या हातातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करत होती. मांजरीला धोका असल्याचं मोलकरणीने ओळखलं होतं. तिने पांचाळकडे मांजरीला नुकसान पोहोचवू नका अशी विनंतीही केली होती. तिने थांबवण्याचाही प्रयत्न केला, मात्र पांचाळ ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता.

पांचाळ नेहमीच पाळीव प्राण्यांवरुन आपल्याशी भांडत असे असं शेख यांनी सांगितलं आहे. मी सोनू मांजरीला घरी आणून तिच्यावर उपचार केले होते. काही काळातच ती आमच्या कुटुंबाची सदस्य झाली होती असंही त्यांनी सांगितलं आहे.