रत्नागिरी औद्योगिक वसाहतीत अनधिकृतपणे गर्भपात सेंटर चालवणाऱ्या एका खाजगी दवाखान्यावर वैद्यकीय पथकाने धाड टाकून या पथकाने रुग्णालयात सुरू असलेल्या गर्भपाताप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा आरोग्य पथक आणि पोलिसांनी संयुक्तपणे केली. याप्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी अनंत नारायण शिगवण, (वय-६७ वर्षे) यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन नोटीस देण्यात आली आहे.

रत्नागिरी औद्योगिक वसाहतीत टि.आर.पी. येथील साई हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधिकारी अनंत नारायण शिगवण, वय-६७ वर्षे, राहणार एम.आय.डी.सी. प्लॉट नं. २०, टी.आर.पी. रत्नागिरी यांच्याकडे वैद्यकीय गर्भपात कायदा सन १९७१ व सन २०२३ मध्ये नमुद आवश्यक असलेली वैद्यकीय शैक्षणिक पात्रता व अनुभव नसताना आणि रुग्णालयाला गर्भपात केंद्राची मान्यता नसताना त्यांनी त्यांच्या मालकीच्या साई हॉस्पीटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य ठेवून गर्भपाताच्या गोळ्या अनधिकृतपणे रुग्णांना देत होते. याप्रकरणी वैद्यकीय गर्भपात कायदा सन १९७१ चे कलम ४ व ५ प्रमाणे त्यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना आरोग्य विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे.

हेही वाचा – Supriya Sule : “सकाळचे पहिले तीन तास बोललेलं आईला आवडत नाही, तेव्हा मी आणि बाबा…”, सुप्रिया सुळेंनी सांगितली शरद पवारांबरोबरची दिनचर्या

हेही वाचा – Petrol-Diesel Price Today: सोने स्वस्त झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर काय परिणाम? मुंबई-पुण्यात आजचा भाव काय?

रत्नागिरीतील टीआरपी येथील साई हॉस्पिटलमध्ये अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर विष्णु जगताप वय-५६ वर्षे, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.१३३/२०२४, वैद्यकीय गर्भपात कायदा सन १९७१ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयाची नोंदणीच झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.