सांगली : एका मनोरुग्ण महिलेने गणेश मंदिराच्या पिछाडीस असलेल्या कृष्णाकाठच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारींवर दगडफेक करत सुमारे ५० हून अधिक वाहनांचे नुकसान केले. या मनोरुग्ण महिलेवर हल्ला करण्याच्या तयारीत नागरिक असतानाच शहर पोलिसांच्या पथकाने या महिलेला संतप्त नागरिकांच्या तावडीतून वाचवत मनोरुग्णालयात दाखल केले.

याबाबत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले, वसंतदादा स्मृतीस्थळ येथे एक वेडी महिला शिवीगाळ करत, दगडफेक करत असल्याची माहिती सायंकाळी मिळाली. शहर पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी अर्चना पाटील, दीपाली पाटसुते, संतोष गळवे, योगेश सटाले, दोन गृहरक्षक दलाचे जवान घटनास्थळी पाठविण्यात आले. या दरम्यान, गणेश मंदिराच्या पिछाडीस असलेल्या रस्त्यावर अनेक मोटारीच्या काचा फोडत ही मनोरुग्ण महिला पांजरपोळ परिसरापर्यंत आली होती. या दरम्यान, समर्थ घाटावर नदीकाठी आलेले नागरिक आपली वाहने, रस्त्यावर लावून गेले होते. या मोटारी, दुचाकी, टेम्पोवर तिने दगडफेक करत सुमारे ५० वाहनांचे नुकसान केले. नागरिकही तिला अटकाव करण्यासाठी आणि मारण्यासाठी लाठ्या काठ्या घेऊन उभे होते. महिला मात्र, हातात सापडेल ते जमावाच्या दिशेने भिरकावत होती. अशा युद्धजन्य परिस्थितीत पोलीस पथकाने तिला पकडून दोरीने बांधून मनोरुग्णालयात नेऊन उपचार करीत मातोश्री वृद्धाश्रमात दाखल केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर ती संतप्त नागरिकांच्या तावडीत सापडण्याचा धोका होता.

case registered against person who stole jewellery of dead woman in kurla bus accident case
कुर्ला बस अपघात: मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्याविरोधात अखेर गुन्हा दाखल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
Crime case against a motorist, pune, motorist act bad with woman, pune news, pune latest news,
पुणे : महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या मोटारचालकावर गुन्हा

हेही वाचा – जयंत पाटलांच्या इस्लामपूरमध्ये जितेंद्र पाटलांसह दोघे इच्छुक

हेही वाचा – सांगली : जतमध्ये पडळकरांच्या मनसुब्यांना स्थानिक विरुद्ध बाहेरील वादाने खीळ

सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून तिच्या बाबतची माहिती अद्याप मिळाली नसली तरी तिच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात येत असल्याचे निरीक्षक मोरे यांनी सांगितले.

Story img Loader