अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विट्यातील तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी आणि ७० हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायालयाने मंगळवारी सुनावली. दंडाची रक्कम पिडीताला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
हेही वाचा >>> महिलांविरोधातील गुन्ह्यांत घट ; राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल; सर्वाधिक गुन्हे बलात्काराचे
विटा येथील बजरंगनगर येथे वास्तव्य असलेला किसन बलभीम देवकर यांने पिडीत मुलीला १० फेब्रुवारी २०२० रोजी इचलकरंजी येथे जबरदस्तीने नेऊन लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी पिडीतेच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस ठाण्यात दिली होती. आरोपीच्या बहिणीने दोघांना पोलीस ठाण्यात हजर केले.
या प्रकरणी तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्या. ए. एस. महात्मे यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. न्यायालयात आठ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय पुरावा, न्यायवैज्ञानिक अहवाल ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला वीस वर्षे सक्तमजुरी आणि ७० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.