उत्तर प्रदेशातील एका पोलीस हवालदाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो यूपी पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला होता. तर हा फोटो ज्या शेतातील आहे, त्या शेतातील पिकाला आग लागल्याचं दिसत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या मदतीसाठी पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या खांद्यावर शेतातील पिकाच्या पेंड्या उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय या पोलिसामुळे शेतकऱ्याचं पिकं आगीपासून बचावलं आहे.

पोलीस कर्मचाऱ्याने एका शेतकऱ्याला केलेल्या मदतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्याच्या या कृतीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. तर अनेकांनी, हा पोलीस नक्कीच एका खरा शेतकऱ्याचा मुलगा असेल, ज्याला पिकाचे महत्त्व आणि शेतकऱ्याची मेहनत कळते असं म्हटलं आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारे मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पोलिसांनी अनेकदा केलेल्या उत्तम कामांची चर्चा सोशल मीडियावर होत असते. मागील काही दिवसांपुर्वीच मेरठ पोलिसांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पोलीस एका वृद्धाचे डाळीची पोते रस्त्यावर सांडले होती, ती डाळ गोळा करण्यासाठी पोलिसांनी त्याला मदत केल्याचं दिसत होतं.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
Farmer Viral Video
शेतकऱ्यांनो तुम्हीही कांद्याचं पिकं घेतलंय का? वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड

हेही पाहा- पिटबुलने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रायव्हेट पार्टचा घेतला चावा, संतप्त नागरिकांच्या मारहाणीत कुत्रा…

हेही वाचा- मोबाईल पाहण्यात पोलीस व्यस्त; शेजारी बसलेल्या गुन्हेगारावर नाही लक्ष; IPS अधिकाऱ्याने शेअर केलेला फोटो पाहून व्हाल थक्क

अशातच आता उत्तर प्रदेशमधील एका पोलिसाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला फोटो ‘उत्तर प्रदेश पोलिस फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिस’च्या अधिकृत ट्विटर पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. फोटो पोस्ट करताना त्याच्या कॅप्शनमध्ये सांगितले की, बलिया जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या पिकाला आग लागली, हे त्यावेळचे प्रशंसनीय चित्र आहे. आपले कर्तव्य चोखपणे पार पाडण्याचा आपला संकल्प आहे. असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

फोटो पोस्ट करताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत तो हजारो लोकांनी पाहिला आहे. शिवाय हा फोटो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या कामाचे कौतुक केलं आहे. तर नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांनी फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, हे लोक गावाशी जोडलेले आहेत, त्यामुळे त्यांना पिकाची किंमत कळते. तर आणखी एकाने लिहिलं की, बहुतांश पोलिस दलात शेतकऱ्यांची मुले आहेत, त्यांनी हे कृत्य केलं त्याचं कारण एक शेतकरी आपल्या पिकासाठी किती कष्ट करतो आणि ते न मिळाल्यास काय होते हे त्यांना माहिती आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीने कमेंट बॉक्समध्ये, पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचं काम या हवालदाराच्या कृतीने केल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader