सचिन तेंडुलकरसारखा खेळाडू पुढील १०० वर्षांत जन्माला येणार नाही, असे मत ज्येष्ठ क्रिकेटपटू रवि शास्त्री यांनी व्यक्त केले. सचिनमध्ये क्रिकेट खेळण्याची अजून भरपूर ताकद शिल्लक असल्याचे मतही शास्त्री यांनी मांडले. शास्त्री यांनी शिर्डीतील साईबाबांच्या मदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सध्याच्या क्रिकेटबद्दल आपली मते मांडली.
ते म्हणाले, सचिनच्या निवृत्तीबद्दल सतत काहीतरी चर्चा सुरू असते. मात्र, सचिन पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्यामुळेच तो अजून मैदानावर खेळतो आहे. ज्यावेळी त्याला निवृत्त व्हावेसे वाटेल, तेव्हा तो नक्कीच त्याबाबतची घोषणा करेल.
फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा यांनी आपली फलंदाजी आणखी सुधारली, तर तो उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बनेल, असेही निरीक्षण शास्त्री यांनी नोंदविले आहे.
आणखी वाचा