मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने जाणार्या एका खासगी बसला बावधन येथील रस्त्यावर अपघात झाल्याची घटना घडली. अपघातामध्ये ५ प्रवासी जखमी झाले असून, या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने परी शर्मा ट्रॅव्हल KA ५१ AC १४४७ या क्रमांकाच्या खासगी बसने ३६ प्रवाशी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जात होते. त्यावेळी चालकाचं गाडीवरील अचानक नियंत्रण सुटल्याने ती बस सर्व्हिस रोडवर पलटी झाल्याची घटना घडली.
या घटनेमध्ये पाच प्रवासी जखमी झाले आहेत. त्या सर्वांना तत्काळ जवळील रूग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आहे. तसेच, या अपघाताच्या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली असून, सर्व्हिस रोडवरील बस बाजूला करण्याचं काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.