सांगली : भारतरत्न क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा पन्नासावा वाढदिवस शिराळा तालुक्यातील औंढी येथे गुढ्या-तोरणे उभा करून सचिनच्या अर्धपुतळ्याची पालखीतून मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. या गावातीलच सचिन जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या ’तेंडल्या’ चित्रपटाच्या टीमने एकत्रित येत आज येथे मोठा जल्लोष केला.

भारतरत्न सचिनच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील प्रत्येक घरी बॅटसह गुढी उभारण्यात आली होती, तर संपूर्ण गावातील रस्त्यांवर रांगोळी काढून कागदाच्या पताका, सचिनचे मोठे पोस्टर लावून गाव सजविण्यात आले होते. हनुमान मंदिरापासून सचिनचा अर्धपुतळा पालखीत ठेवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या सुरुवातीला गावातील महिलांचे लेझीमपथक होते. हलगी आणि तुतारीच्या निनादात निघालेल्या पालखीवर फुलांची उधळण करण्यात येत होती. सचिनच्या शतकी खेळीची आठवण म्हणून सचिनचे आवडते खाद्य असलेल्या शंभर वडापावचा नैवेद्य पालखीसमोर दाखाविण्यात आला.

Youth murder Amravati, Amravati Crime news,
अमरावती : युवकाची हत्‍या अन् संतप्‍त नागरिकांचा पोलीस ठाण्‍यासमोर ठिय्या
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
youth murder in love affair, youth murder Dandekar Pool area,
पुणे : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
child died in a collision with a municipal garbage truck in Govandi Mumbai news
गोवंडीमध्ये महापालिकेच्या कचरावाहू ट्रकच्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू
couple committed suicide by hanging himself with a rope In Lakshmipur of Mulchera taluka gadchiroli
प्रेमीयुगुल आत्महत्या प्रकरण: मुलीच्या वडिलांनीही घेतला गळफास
PM Narendra Modi inaugurated Nangara Vastu Museum at Pohradevi Washim district on Saturday
पंतप्रधान मोदींनी घेतला नगारा वाजवण्याचा आनंद; वाशीमच्या पोहरादेवी येथे…
Phulewada Replica in Pune
पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री
Pune Board of MHADA, MHADA, MHADA lottery
पुणे, कोल्हापूर, सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाच हजार घरांच्या सोडतीसाठी जाहिरात

हेही वाचा – “मविआत एकत्र काम करण्याची इच्छा, पण…”, शरद पवारांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

गावातीलच सचिन जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या तेंडल्या या चित्रपटाचे प्रमोशन यावेळी मुलांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी आजचा दिवस जागतिक क्रिकेट दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे यावेळी जाहीर केले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, सरपंच चेतन पाटील, चैतन्य काळे, नचिकेत वाईकर, फिरोज शेख, अमन कांबळे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा – “खारघर प्रकरणाची चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”, ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी

पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होत असलेल्या तेंडल्या चित्रपट एक राष्ट्रीय आणि पाच राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित झाला आहे. या सिनेमातील अनेक घटना या गावात घडलेल्या असल्याने सचिनचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी औंढी या गावाची निवड करण्यात आल्याचे दिग्दर्शक जाधव यांनी सांगितले.