रत्नागिरी : रत्नागिरीतील दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने मिरजोळे येथील शरीरसौष्ठवच्या बेकायदेशीर इंजेक्शन सिरिज व औषधांचा साठा केलेल्या घरावर छापा टाकून साडेतीन हजार रुपये किंमतीची इंजेक्शन्स व औषधे जप्त केली आहेत. या कारवाईत औषधांचा बेकायदेशीर साठा करणाऱ्या साईराज रमेश भाटकर (२६, रा. एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी) याला अटक करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साईराज भाटकर हा सौष्ठव वाढण्यासाठी ही औषधे उपयुक्त असल्याचे सांगून घातक ठरणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची इंजेक्शन्स् व औषध बेकायदेशीरपणे बाळगून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे येथील एमआयडीसी परिसरातील साईराज भाटकर याच्या घरावर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या दरम्यान छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना इंजेक्शन व औषधांचा बेकायदेशीर साठा आढळून आला. ही औषधे खरेदी व विक्रीसाठी ड्रग्ज आणि कॉस्मेटिक अ‍ॅक्ट १९४० अंतर्गत परवाना आवश्यक असतानाही कोणताच परवाना न घेता साईराज भाटकर या औषधाची विक्री करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

हेही वाचा – Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा भाजपाला इशारा; म्हणाले, “२०२४ मध्ये सगळ्यात मोठा…”

हेही वाचा – सिंधुदुर्ग : मासेमारीला गेलेली नौका दुर्घटनाग्रस्त, तिघांचा बुडून मृत्यू

पोलिसांनी सर्व इंजेक्शन व औषधांचा साठा जप्त केला असून, त्याची किंमत ३ हजार ७२८ रुपये इतकी आहे. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २७५, २७८, १२३, १२५ अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी साईराज भाटकर याला अटक केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A seller of illegal bodybuilding injection series and medicine was arrested in ratnagiri ssb