शहरातील ज्येष्ठ व्यापारी रमेशभाई मेहता यांचे मंगळवारी अहमदाबादजवळील अपघातात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
गुजरातमधील पालनपूर शहराजवळ मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रमेशभाई मेहता व त्यांचे पुतणे प्रतीक हे दोघे महिंद्रा लोगान मोटारीने समोरच्या पाण्याच्या टँकरला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती, की यात मेहता यांच्या मोटारीचा चक्काचूर झाला. अपघातात रमेशभाई मेहता जागीच ठार झाले. त्यांचा पुतण्या प्रतीक हा मोटार चालवत होता. मात्र अपघाताच्या दरम्यान तो मोटारीबाहेर फेकला गेल्याने बचावला. त्यालाही मार लागला आहे. मोटारीचा चालक प्रतीक याच्याविरुद्ध तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेशभाई यांचा मृतदेह बुधवारी दुपारी नगरला आणण्यात आला. त्यांच्यावर उद्या (गुरुवार) सकाळी १० वाजतात अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रमेशभाई यांची गंजबाजारात किराणा व मसाल्याच्या पदार्थांची दोन दुकाने आहेत. औद्योगिक वसाहतीत त्यांचे कोल्ड स्टोरेजही आहे. जागेच्या खरेदी-विक्री व्यवसायतही ते होते. अपघाताचे वृत्त समजताच शहरातील अनेक व्यापा-यांनी त्यांच्या घरी धाव घेतली.  

Story img Loader