सोलापूर : प्रेयसीने लैंगिक छळप्रकरणी केलेल्या आरोपामुळे लग्न झाल्यानंतर ‘सुहागरात’ कारागृहात काढाव्या लागलेल्या माढा तालुक्यातील नवविवाहित तरुणाची जामिनावर मुक्तता झाल्यामुळे त्यास सासूरवाडीला पहिल्या दिवाळी सणाचा मानाचा पाहुणचार घेता आला.या अफलातून खटल्याची पार्श्वभूमी अशी की, शेटफळ-कुर्डूवाडी रस्त्यावरील एका गावातील तरुणाचा विवाह झाला. दुसऱ्या दिवशी लग्नाच्या पश्चात विधी चालू असतानाच पोलिसांची गाडी घरासमोर येऊन धडकली आणि पोलीस गाडीतून नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्याला गेली. नवरदेवाला समजेना काय झाले. पोलीस ठाण्यात त्यास समजले की, त्याच गावातील एका तरुणीने त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. आरोपी तरुणाचे माझे दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. काल मी बहिणीच्या घरी गेले असताना आरोपी तेथे आला आणि त्याने माझा लैंगिक छळ केला, असा आरोप त्या तरूणीने केला होता.
‘सुहागरात’ कारागृहात, दिवाळ सणाचा पाहुणचार सासरवाडीत..!
प्रेयसीने लैंगिक छळप्रकरणी केलेल्या आरोपामुळे लग्न झाल्यानंतर 'सुहागरात' कारागृहात काढाव्या लागलेल्या माढा तालुक्यातील नवविवाहित तरुणाची जामिनावर मुक्तता झाल्यामुळे त्यास सासूरवाडीला पहिल्या दिवाळी सणाचा मानाचा पाहुणचार घेता आला.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-11-2023 at 19:49 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man caught in the case of sexual harassment in madha taluka is on bail solapur amy