धाराशिव : ‘मराठा आरक्षण’ असा मजकूर चिठ्ठीत लिहून भूम तालुक्यातील गिरवली येथील २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमरनाथ भाऊसाहेब कदम असे मृत तरुणाचे नाव असून अंजनसोंडा शिवारातील गट नंबर ५१ मधील स्वतःच्या शेतातील बांधावर आलेल्या लिंबाच्या झाडाला भगव्या गमजाने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अमरनाथ पश्चात आई-वडील असा परिवार आहे. अमरनाथ हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन वाशी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार अच्युत कुटे करीत आहेत.

हेही वाचा – धाराशिव : शाकंभरी नवरात्रोत्सवास १८ जानेवारीपासून प्रारंभ, मंचकी निद्रा ११ जानेवारीपासून, १८ जानेवारीला घटस्थापना

हेही वाचा – जेएन.१ उपप्रकाराचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अमरनाथ कदम हा मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथे झालेल्या जाहीर सभेला उपस्थित राहिला होता. आरक्षणाच्या लढ्यात त्याचा सक्रिय सहभाग होता. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गावातील साखळी उपोषणामध्येही त्याने हिरीरीने सहभाग नोंदवला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A youth commits suicide by writing maratha reservation in a note incident in bhum taluka of dharashiv district ssb