Aaditya Thackeray PC: मुंबई महापालिकेच्या कारभारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. “मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे”, असा आरोप त्यांनी केला आहे. “घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी पाच हजार कोटींची घोषणा केली होती. त्यासाठी काढलेले टेंडर रद्द करण्यात आले आहे”, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

“१०० वर्षांपूर्वी कोण योग्य किंवा अयोग्य होतं यावर…”, राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका!

Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
deportation action against criminals is on paper only
पुणे : तडीपारीची कारवाई कागदावरच; तडीपार गुन्हेगारांचा सर्रासपणे शहरात वावर
Woman police officer abused for not taking action on vehicle
पिंपरी : कारवाई करू नये म्हणून महिला पोलिसाला शिवीगाळ
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल

मुंबईत पाच हजार कोटींचे रस्ते बनवणार तरी कसे? असा सवालही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे मुंबईतील इतर रस्त्यांची कामं रखडली आहेत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. “पाच हजार कोटींची घोषणा केल्यानंतर मुंबईतील रस्ते रातोरात खड्डेमुक्त होतील, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. येत्या पावसाळ्यात जर खड्ड्यांमुळे मुंबईकरांचे हाल झाले, तर त्यासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार असतील”, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे.

“अरे भाई आखिर कहना क्या चाहते हो?”, शरद पवारांचा उल्लेख करत फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल, म्हणाले…

मुंबईकरांच्या खिशातून शहराच्या सौंदर्यीकरणासाठी १७०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. हे सौंदर्यीकरण नेमकं कसं करण्यात येणार आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे. सौदर्यींकरण म्हणजे केवळ एलईडी लाईट लावणं नव्हे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. “मुंबई महापालिकेत दडपशाही सुरू आहे. काही लोकांच्या ९० दिवसात सहा वेळा बदल्या झाल्या आहेत. हे सरकार बदली सरकार आहे”, असा घणाघातही त्यांनी केला आहे. “मुंबई सोन्याचं अंडी देणारी कोंबडी त्यांच्यासाठी असेल, पण ही मुंबई आमची जन्मभूमी आहे”, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

Story img Loader