युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे बुधवारी (२३ नोव्हेंबर २०२२) एक दिवसीय बिहार दौऱ्यावर जाणार आहेत . ते बिहारची राजधानी पटना येथे बिहारचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेत्या, खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. शिवसेनेसह महाविकासआघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्तेही आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशातच आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जात असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024 (1)
Raj Thackeray: “निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील”, राज ठाकरेंचं सूचक विधान; नेमकं राज्यात काय घडणार आहे?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
maharashtra vidhan sabha election 2024 aditya thackeray milind deora sandeep deshpande worli assembly constituency
लक्षवेधी लढत : आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याची खेळी
Uddhav Thackeray speech
‘तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन’, उद्धव ठाकरेंचे छत्रपती संभाजीनगरमध्ये भावनिक आवाहन
Narendra Modi Slams Uddhav Thackeray
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला, “राहुल गांधी ज्या दिवशी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतील तेव्हा…”
Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Khadakwasla and Hadapsar Constituency
हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !

आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याचं निश्चित कारण काय असाही प्रश्न अनेकजण विचारत आहेत. यावर शिवसेनेकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात उत्तर देण्यात आलंय. यानुसार, आदित्य ठाकरेंची हा बिहार दौरा केवळ सदिच्छा भेटीसाठी आहे.

शिवसेनेच्या निवेदनात नेमकं काय म्हटलं?

हेही वाचा : VIDEO: “…तेव्हा ठाकरे गटात उरलेल्या १५ पैकी आठ आमदार शिंदे गटात येतील”, खासदार प्रतापराव जाधवांचा दावा

शिवसेनेने या भेटीला सदिच्छा भेट म्हटलं असलं तरी या भेटीबाबत अनेक राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत. त्यामुळे या भेटीनंतर आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.