राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देताना सत्तारांची जीभ घसरली. त्यांनी गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सत्तारांच्या या टीकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या घरावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे. तर काही कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या मुंबई येथील घरावर दगडफेक करत खिडकीच्या काचा फोडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनाक्रमानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही अब्दुल सत्तारांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. संबंधित विधानाचा निषेध करताना आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तारांचा उल्लेख ‘अब्दुल गद्दार’ असा केला आहे. तसेच अशी घाणेरडी लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवी आहेत का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारला विचारला आहे.

हेही वाचा- “या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रात पळवून…” आदित्य ठाकरेंचं अब्दुल सत्तारांना जोरदार प्रत्युत्तर

अब्दुल सत्तारांच्या विधानाचा समाचार घेताना आदित्य ठाकरे बुलढाण्यातील सभेत म्हणाले, “आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे. या मंत्री महोदयांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेला शब्द अतिशय घाणेरडा आहे. तो शब्द मी उच्चारूदेखील शकत नाही. एवढा घाणेरडा तो शब्द आहे. त्यामुळे मी आज थेट प्रश्न केंद्र सरकारला प्रश्न विचारतो की, असे लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवे आहेत का?”

हेही वाचा- “टीकेची पातळी घसरत असेल तर…” अब्दुल सत्तारांच्या अभद्र टिप्पणीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया

“महाराष्ट्रातील जनता म्हणून मी तुम्हालाही विचारत आहे की, असे घाणेरडे लोकं तुम्हाला हवी आहेत का? जी लोकं महिलांना शिवीगाळ करतात. शेतकऱ्यांची मजा उडवतात. जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू पिता का?’ असं विचारतात, अशी लोकं तुम्हाला मंत्री म्हणून चालणार आहेत का?” असे सवालही आदित्य ठाकरेंनी विचारले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray on abdul sattar abusive statement over supriya sule rmm
Show comments