ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता शिंदे-फडणवीस सरकार पडेल पण मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची ताकद आणि धमक शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाही, अशी शब्दात आदित्या ठाकरेंनी टीकास्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आता सरकार पडेल पण मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. यांना (एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस) सतत दिल्लीला जावं लागतं. पण विस्तार काही होणार नाही, हे लिहून घ्या. ४० लोकांमधून जे मंत्रिमंडळाबाबत आशा लावून बसले आहेत, त्यांना काहीही मिळणार नाही. मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही, कारण विस्तार करण्याची ताकद आणि धमक यांच्यात नाही.”

हेही वाचा- “…म्हणून फडणवीसांनी मला घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला”, एकनाथ खडसेंनी सांगितलं कारण

“१ जुलैला मुंबईत महामोर्चा”

“१ जुलैला मुंबईत महामोर्चा काढणार आहोत. गेल्या एक वर्षापासून मुंबईत प्रशासक आहेत. येथे कोणत्याही पक्षाचा किंवा जनतेचा प्रतिनिधी नाहीये. ना नगरसेवक, ना महापौर ना कुठले समिती अध्यक्ष आहेत. हे कुणी नसताना तिथे मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरू आहेत. यामुळे १ जुलै रोजी दुपारी चार वाजता हा मोर्चा काढला जाणार आहे. सर्व मुंबईकर या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. मुंबईचे हाल होतायत, असं ज्यांना वाटतंय, ते सगळे नागरिकही या मोर्च्यात सहभागी होणार आहेत,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray on cabinet expansion shinde fadnavis govt will collapse rmm
Show comments