ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य केलं. आज विधानसभेत शिंदे गटाच्या नेत्यांचे चेहरे पाहता, त्यांना मंत्रिपदं मिळणार नाहीत, असं दिसतंय, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. मागून आलेल्या गटाचा मंत्रीमंडळ विस्तार झाला, पण ओरिजनल गद्दारांना मंत्रिपदं मिळणार नाहीत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. ते विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आज सगळ्यात जास्त गंमत याची वाटत होती की, एक वर्षापूर्वीची जी ओरिजनल गद्दारांची बॅच होती, त्यांना मंत्रीपद मिळेल असं वाटत होतं. परंतु आज विधानसभेत त्यांचे चेहरे पाहून त्यांच्या मनात काय आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं.”

हेही वाचा- विधान परिषदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर पहिल्या सात मिनिटातच नीलम गोऱ्हेंच्या पदावरुन जयंत पाटील आक्रमक

“मंत्रीपद आज मिळेल, उद्या मिळेल, असं त्यांना वाटत होतं. पण त्यांच्या मागून काही लोक विस्तार करून आले. पण यांचा उद्याप विस्तार होईना. त्यांना मंत्रीपदंही मिळणार नाहीत. त्यांचा (शिंदे गट) काही विस्तार होणार नाही. ओरिजनल गद्दारांना मंत्रीपदं मिळणार नाहीत. यांना खाती मिळणार नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार होणं शक्य नाही. ते आता कधीच मंत्री होणार नाहीत,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.