Aaditya Thackeray on Maharashtra Karnataka Conflict : महाराष्ट्राच्या सीमेवरील असलेल्या बेळगावात मराठी भाषकांचा महामेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्यास राज्य सरकारचा विरोध असल्याने येथे पुन्हा एकदा महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा संघर्ष पेटला. दरम्यान, या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे.
“बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला कर्नाटक सरकारने परवानगी तर नाकारलीच, त्यावर बेळगावात संचारबंदीही लागू केली. सीमाही बंद केल्या जात आहेत. मराठी माणसांवरच्या या अन्यायाचा तीव्र निषेध!” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >> Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं पहिलंच दमदार भाषण, देवेंद्र फडणवीसांनाही केलं लक्ष्य!
“बेळगाव हा मराठी अस्मितेचा अविभाज्य भाग आहे आणि राहणारच! माझं कर्नाटकातल्या सरकारला आवाहन आहे की त्यांनी मराठी माणसांवरचा हा अन्याय तातडीने थांबवावा! महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितापेक्षा मोठं काहीही नाही!
आणि केंद्र सरकारकडे देखील मागणी आहे की हा सर्व विवादित भाग तातडीने केंद्रशासित करावा”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला कर्नाटक सरकारने परवानगी तर नाकारलीच, त्यावर बेळगावात संचारबंदीही लागू केली. सीमाही बंद केल्या जात आहेत. मराठी माणसांवरच्या ह्या अन्यायाचा तीव्र निषेध!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 9, 2024
बेळगाव हा मराठी अस्मितेचा अविभाज्य भाग आहे आणि राहणारच!
माझं…
दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीला बेळगावमध्ये मेळावा घेण्यापासून थांबवल्याचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात उमटले. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या सर्व आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.
वादाचं नेमकं कारण काय
२००४ पासून बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिक बेळगावमध्ये मेहामेळावा घेतला जातो. या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारल्याने छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये मेहामेळावा घेण्याचे ठरवले. मात्र या ठिकाणी येणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी ठेवलं आहे.