जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. यामध्ये काही महिलांसह अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी अशाप्रकारे लाठीमार केल्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजुने एकमेंकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं आहे.

जालन्यात आंदोलकांवर भयानक लाठीमार झाला. हे सरकार जनरल डायरचं आहे की महाराष्ट्राचं? असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारला. तसेच मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांना न कळवता पोलीस अशाप्रकारे लाठीमार करतील, हे अशक्य आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा

हेही वाचा- “नितेश राणे आता तोंडात बोळा घालून…”, एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाच्या नेत्याची बोचरी टीका

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “जालन्यात जी घटना घडली, ती आपण सर्वांनी पाहिली आहे. हा भयानक लाठीमार होता. एखाद्या शत्रूवर हल्ला करावा, अशाप्रकारे लाठीमार करायला लावला आहे. मी दोन-अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांचं कार्यालय जवळून पाहिलं आहे. एवढं संवेदनशील आंदोलन होत असताना, मुख्यमंत्र्यांना न कळवता पोलीस लाठीमार करतील, हे अशक्य आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना १०० टक्के हे माहीत असणार. त्यामुळे या खोके सरकारला राजीनामा देण्याची गरज आहे. लाज असेल तर राजीनामा देतील.”

हेही वाचा- “…तर महाराष्ट्रातला मनसेचा पहिला खासदार १०० टक्के मीच असेल”, वसंत मोरेंचं मोठं विधान

“बारसू येथे असंच आंदोलन झालं होतं. तिथेही महिलांवर लाठीमार आणि अत्याचार झाला. खारघरमध्ये जे प्रकरण घडलं, त्याचीही चौकशी झाली नाही. वारकऱ्यांवरही असाच लाठीमार झाला. आता मराठा समाजाच्या तरुणांवर लाठीमार झाला. तरीही सरकार लाज नसल्यासारखं वागत आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्व लोक शांततेत आंदोलन करत असताना एवढा लाठीमार करण्याची गरज नव्हती. हे सरकार नक्की कुणाचं आहे? हे सरकार जनरल डायरचं आहे की महाराष्ट्राचं? असा प्रश्न पडतो”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.