शिवसेना पक्ष फूटल्यानंतर पक्षाचे दोन गट पडले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा शिंदे गट हा महायुतीत भाजपा आणि अजित पवार गटाबरोबर (राष्ट्रवादी) आहे. महायुतीची राज्यात सत्ता आहे. तर दुसऱ्या बाजूला पक्षातील बहुसंख्य आमदार, खासदार हे एकनाथ शिंदेंबरोबर गेल्यामुळे शिवसेनेचा ठाकरे गट कमजोर झाला आहे. अशातच ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. यावर दोन्ही पक्षांमधील मोठ्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील यावर आपली भूमिका मांडली आहे. आदित्य ठाकरे हे इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं की, ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत चर्चांमध्ये किती तथ्य आहे? तसेच राज ठाकरे शिवसेनेत परत येण्याच्या काही शक्यता आहेत का? यावर आदित्य ठाकरे म्हणाले, या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. या जर-तरच्या गोष्टींवर बोलू नका, त्याला काही अर्थ नसतो. आत्ता जे आहे त्यावर आपण बोलू.

What Amit Thackeray Said About Raj Thackeray and Uddhav Thackeray?
Amit Thackeray : “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये, कारण..”; अमित ठाकरे काय म्हणाले?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
MNS Chief Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंनी लढवलेली आणि जिंकलेली एकमेव निवडणूक कुठली? त्यांनीच दिलं उत्तर म्हणाले..
Badnera Vidhan Sabha Assembly Priti Band
Priti Band : उद्धव ठाकरेंना धक्का; ऐन निवडणुकीत बडनेरात ठाकरे गटात बंडखोरी, प्रिती बंड अपक्ष निवडणूक लढणार
Amit Thackeray and Uddhav Thackeray
Amit Thackeray on Uddhav Thackeray : “… अन् दोन भाऊ एकत्र येण्याचा विचार माझ्यासाठी संपला”, अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
shivadi vidhan sabha
शिवडीमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार ठरेना, तिढा न सुटल्यामुळे शिवडी धुमसतेय
MLA Yashomati Thakur says Uddhav Thackeray should be the Chief Minister
“उद्धव ठाकरेच मुख्‍यमंत्री व्‍हावेत..”, आमदार यशोमती ठाकूर यांच्‍या वक्‍तव्‍याची चर्चा
Sujat Ambedkar on Raj Thackeray
Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…”

आदित्य ठाकरेंच्या उत्तरानंतर त्यांना राज ठाकरेंसाठी शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत का? युतीच्या मार्गाने किंवा कुटुंबाचे दरवाजे उघडे आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, मी २०१३ ला या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आम्ही त्याच लोकांना आमचं कुटुंब मानतो जे वर्षानुवर्षे आमच्याबरोबर आहेत. आम्ही त्यांनाच गृहित धरतो. रक्ताच्या नात्यापेक्षा आमच्याबरोबर असणारी माणसं हीच आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. पक्षाच्या चढत्या-उतरत्या काळात आमच्याबरोबर असणारी माणसं, माझ्या आजोबांच्या काळापासून आमच्याबरोबर असलेली माणसं, त्यांनाच घेऊन पुढं जायचं आहे.

ह ही वाचा >> आंदोलन गुंडाळण्यासाठी ५० खोक्यांची ऑफर? मॅनेज होण्याबद्दल मनोज जरांगे स्पष्टच बोलले

आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्ही इंडिया आघाडीचंच बघा. इंडिया आघाडीत आता असे काही पक्ष आहेत जे आमच्याबद्दल काहीतरी वेगळा विचार करत होते, आम्ही त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळा विचार करत होतो. परंतु, आता आम्ही एकत्र आलो आहोत. देशासाठी, राज्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. या सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे.